तळ्याकाठी गाती लाटा
लाटामधे उभी झाड
झाडावर धीवरची
दिसे चोच लाल जाड
शुभ्र छाती पिंगे पोट
जसा चाफा यावा फुली
पंख जणू थंडी मधे
बन्डि घाले आमसुली
गड्या पाखरा तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना
नको मारू मात्रा मासा
[ही कविता कोणाची आहे ते आता आठवत नाही. ही कविता आम्ही बालभारती च्या कॅसेट वर ऐकली. कॅसेट वरची कविता आणि अगदी त्याची चाल पण व्यवस्थित आठवते. कोणाला ह्या कवितेबद्दल काही माहिती असल्यास जरूर द्यावी. -PP]
Ho mala changale aathavate, Mazya khoop aawadhci aahe hi kavita,
ReplyDeleteThanks
It's my favourite poem of 4th Std.
ReplyDeleteजांभळाचे तुझे डोळे
ReplyDeleteतुझी बोटे जास्वंदीची
आणि जवस फुलाची ...
अस कडव आहे पुढच आठवतं का?
जांभळाचे तुझे डोळे
Deleteतुझी बोटे जास्वंदीची
आणि छोटी अखेरची
निळ्या जवस फुलाची...
तळ्याकाठी गाती लाटा,
ReplyDeleteलाटांमध्ये उभे झाड.
झाडावर धीवराची,
हाले चोच लाल जाड.
शुभ्र छाती, पिंगे पोट,
जसा चाफ़ा यावा फ़ुली.
पंख जणू थंडीमध्ये,
बंडी घाली आमसुली.
जांभळाचे तुझे डोळे,
तुझी बोटे जास्वंदीची.
आणि छोटी अखेरची
पिसे जवस फुलांची.
गड्या पाखरा, तू असा
सारा देखणा रे कसा?
पाण्यावर उडताना,
नको मारू मात्र मासा.
कवी श्रीधर शनावरे आहेत बहुतेक
ReplyDelete