Sunday, July 14, 2013

ऋतुराजाची चाहूल

 - पद्मा गोळे

आला शिशिर संपत
पानगळती सरली,
ऋतुराजाची चाहूल
झाडावेलीना लागली.

देवचाफा हा पहा ना
अंगोपांगी बहरला,
मोगराही कोवळ्याशा
पाने सजाया लागला. 

डोळे खिळविती माझे
जास्वंदीची लाल फुले,
बहाव्याने येथे तेथे
सोनतोरण बांधिले.

'कुहू' गाऊन  कोकिळा
करी वसंत-स्वागत,
तिलाही मी विनविते
शिकव ना मला गीत. 

1 comment:

  1. देवचाफा नाही तिथे सोनचाफा हा शब्द आहे...

    ReplyDelete

A Homeless Night