गीत रामायणातील अतिशय सुंदर काव्य
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
दैवजात दु:खे भरता दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
माय कैकेयी ना दोषी, नव्हे दोषी तातराज्यत्याग, काननयात्रा, सर्व कर्मजातखेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा - 1
अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
वियोगार्थ मीलन होते, नेम हा जगाचा - 2
जिवासवे जन्मे मृत्यु, जोड जन्मजातदिसे भासते ते सारे विश्व नाशवंतकाय शोक करिसी वेड्या, स्वप्नीच्या फळांचा? - 3
तात स्वर्गवासी झाले, बंधु ये वनात
अतर्क्य ना झाले काही, जरी अकस्मात
मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा - 4
जरामरण यातून सुटला कोण प्राणिजात?दू:खमुक्त जगाला का रे कोणी जीवनात?वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा - 5
दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ
क्षणिक तेवी आहे बाळा, मेळ माणसाचा - 6
नको आसू ढाळू आता, पूस लोचानासतुझा आणि माझा आहे वेगळा प्रवासअयोध्येत हो तू राजा, रंक मी वनीचा - 7
नको आग्रहाने मजसी परतवूस व्यर्थ
पितृवचन पाळून दोघे होऊ रे कृतार्थ
मुकुटकवच धारण करी, का वेष तापसाचा? - 8
संपल्याविना ही वर्षे दशोत्तरी चारअयोध्येस नाही येणे, सत्य हे त्रिवारतूच एक स्वामी आता राज्यसंपदेचा - 9
पुन्हा नका येऊ कोणी दूर या वनात
प्रेमभाव तुमचा माझ्या जागता मनात
मान वाढावी तू लोकी अयोध्यापुरीचा - १०
गीत: ग. दि. माडगुळकर
संगीत: सुधीर फडके
On which taal is it based?
ReplyDeleteमला खुप आवडतात हे शब्द
ReplyDeleteयातून जीवनातली वास्तविकता समजते
एक लाट हीच तर प्रत्येकाच्या जीवनातला वळण मार्ग
पण त्या दुसऱ्या ओंडक्याला शोधावं कुठं... कुठं
इथंच खरी मेख आहे
मला खुप आवडतात हे शब्द
ReplyDeleteलाट ही प्रत्येकाच्या जीवनातला वळण मार्ग
पण त्या दुसऱ्या ओंडक्याला शोधावं कुठं... कुठं
इथंच खरी मेख आहे.....
माझ्या वडिलांनी हे गीत आम्हाला नेहमी म्हणून दाखवल आज
ReplyDeleteते नाहीत पण या गण्या सोबत त्यांच्या आठवणी मिळाल्या thanks
माझे वडील हे गीत आम्हाला म्हणून दाखवायचे आज ते नाहीत
ReplyDeleteपण या गण्यासोबत सगळ्या आठवणी जाग्या झाल्या thanks